कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ हत्तीणीच्या परतीसाठी जिल्हा प्रशासन कायदेशीर मार्ग काढण्यासाठी हालचाली करत आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज
(ता. ५) मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ‘महादेवी’ला गुजरातमधील ‘वनतारा’ केंद्रात हलवल्यानंतर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
रविवारी पार पडलेल्या पदयात्रा आणि मोर्च्यानंतर प्रशासन कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असून, या बैठकीत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील आमदार-खासदार, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासन स्पष्ट करत आहे.
निर्णयावर सर्वांचे डोळे लागले आहेत, आणि या बैठकीतून काय निष्पन्न होते याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.