शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला वेग

शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला वेग; शिंदे गटाचं राज ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण

शिंदे गटाचं राज ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण

मुंबई : त्रिभाषा सूत्रावरील निर्णय रद्द झाल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल

वीस वर्षांनंतर एकाच मंचावर आले. त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाकडूनही राज ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती देत सांगितलं, “उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं सुरू आहे,

पण आम्हीही निमंत्रण दिलं आहे. ते केव्हा येतात याची वाट पाहतोय.”

दरम्यान, भंडाऱ्यात बोलताना भाजप नेते परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनीही प्रत्युत्तर दिलं.

“इथे कोणी कोणाचा बाप नाही. सगळे समान आहेत. महायुती सरकार एकत्रितपणे चालवत आहे,” असं देसाई म्हणाले.

Read Also : https://ajinkyabharat.com/mazool-week-rasta-mojani-and-seema-fixed/