93 वर्षांचा इतिहास मोडीत! शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताची परदेशात थरारक टेस्ट विजय

93 वर्षांचा इतिहास मोडीत! शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताची परदेशात थरारक टेस्ट विजय

ओव्हल (लंडन) – शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचत

ओव्हल मैदानावर इंग्लंडवर थरारक विजय मिळवला. भारताने ही कसोटी अवघ्या 6 धावांनी

जिंकत पाच सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत आणली, आणि परदेशात कोणत्याही मालिकेतील

पाचवा कसोटी सामना जिंकणारा भारतीय संघ पहिल्यांदाच ठरला.

पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती. मात्र मोहम्मद सिराज,

प्रसिद्ध कृष्णा आणि ध्रुव जुरेल यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे इंग्लंडचा डाव कोसळला.

सिराजने शेवटी गस एटकिंसनला क्लीन बोल्ड करत सामना भारताच्या पारड्यात टाकला.

एकीकडे इंग्लंडच्या फलंदाजांना सातत्याने फटकेबाजी करत लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न सुरू असताना,

भारतीय गोलंदाजांनी संयम आणि अचूकतेचा कस दाखवला.

सिराजने शेवटी शानदार यॉर्करने एटकिंसनचा ऑफ स्टंप उडवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

या ऐतिहासिक विजयामुळे:

  • भारताचा परदेशातील कसोटीत सर्वात कमी धावांनी मिळवलेला विजय

  • परदेशात मालिकेतील पाचवा कसोटी सामना प्रथमच जिंकला

  • शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवीन युगाची सुरुवात

क्रिकेटच्या इतिहासात ही लढत कायम स्मरणात राहील, जिथे केवळ साहस, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विजय खेचून आणला गेला.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolichaya-district-female-sick/