“अकोला शासकीय रुग्णालय परिसरात ऑटो पार्किंगचा अडथळा; रुग्णांच्या जिवाला धोका!”

"अकोला शासकीय रुग्णालय परिसरात ऑटो पार्किंगचा अडथळा; रुग्णांच्या जिवाला धोका!"

अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्यासह इतर तालुक्यांतील रुग्णांसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे.

मात्र, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ऑटोचालकांच्या मनमानी पार्किंगमुळे गंभीर अडथळे निर्माण होत आहेत.

रुग्णालयाच्या परिसरात कोणत्याही नियमावलीशिवाय ऑटो रिक्षा पार्क केली जात असल्याने, रुग्णवाहिकांना आत प्रवेश करणं कठीण झालं आहे.

या परिस्थितीचा थेट फटका गंभीर रुग्णांना बसत असून, वेळेत उपचार मिळण्यात अडथळा येतो.

अनेकदा रुग्णाला स्ट्रेचरवरून नेत असतानाही रस्ता अडवलेला असल्यामुळे नातलगांना त्रास सहन करावा लागतो.

यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.

ऑटोचालकांवर कोणताही शिस्तबद्ध नियंत्रण यंत्रणा नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

स्थानिक नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यातूनही संताप व्यक्त करण्यात येत असून,

त्यांनी याविरोधात उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शासकीय रुग्णालय प्रशासनाने त्वरित योग्य ती व्यवस्था करून, रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग आणि

ऑटो रिक्षांसाठी निश्चित पार्किंग जागा उपलब्ध करून दिल्यास रुग्णांच्या सेवेत अडथळा येणार नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/sona-this-grand-mahakal-kavad-yana-festival/