चौहटाबाजार येथील नागरिक सहाय्यक अभियंत्याचा घेत आहेत शोध.

चौहटाबाजार येथील नागरिक सहाय्यक अभियंत्याचा घेत आहेत शोध.

सहाय्यक अभियता यांना कर्तव्याची जाण नाही….

चौहटा हे गाव व्यावसायिक दृष्ट्या नावाजलेले आहे या गावाला पंधरा ते वीस खेडे लागून आहेत.

नव्याने रुजू झालेले विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी यांना नोकरी करण्याचे भान राहिले नाही.

महत्त्वाचे असे की यांना ऑफिस च्या वेळेचे बंधन नाही. किंवा तशी हलचल बुकाला नोंदं केलीजात नाही.

कंत्राटी कर्मचारी यांच्या भरोशावरच येथील कारभार सुरू आहे. साहेब हजर राहात नसल्यामुळे कंत्राटी कर्मचारी सर्व काही ऑल इज वेल करतात.

कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश शासन स्तरावरून पारित असताना याची अंमलबजावणी मात्र कुठे होताना दिसत नाही.

मीटर धारक सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत बिल कमी किंवा जमा करण्याकरित या ऑफिसचे उंबरठे झिजवतात.

येथे कर्मचारी व अधिकारी हजार नसल्यामुळे त्यांना निराशेने परत जावे लागते.

एखादेवेळी तो अधिकारी आल्यावरही त्याच्या बळी पडावे लागते.त्यामुळे वीजधारकांनी कुणाला सांगावे .

अशा दुहेरी बेजबाबदारपणाचा सामना आज रोजी चौहटा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक सहन करत आहे .

ज्या विद्युत ग्राहकांना दोन हजार रुपये बिल यायचं त्यांना आज रोजी सात हजार आठ हजार रुपये बिल येत आहे

बिल कमी करायला गेल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याची वागणूक ग्राहकांसोबत चांगली नाही.

या महत्त्वपूर्ण बाबिकडे आकोट उपविभागीय अधिकारी विद्युत वितरण कंपनी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिक मागणी करत आहेत.

याकडे जर दुर्लक्ष करण्यात आले तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-mokat-kutryancha-dhumaku/