ऊत्रादा येथील शेतातील विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…

ऊत्रादा येथील शेतातील विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह...

( ओळख पटविण्याचे अमडापूर पोलिसांचे आवाहन )

चिखली – तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ऊत्रादा शिवारातील शेतकरी केसरसिंग इंगळे यांच्या

शेतातील विहिरीत एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे.

ऊत्रादा शिवारात शेतकऱ्याच्या विहिरीत अनोळखी इसमाचे प्रेत असल्याची माहिती अमडापुर पोलिसांना मिळाली असता बिट

जमदार लक्ष्मण टेकाळे यांनी सदरच्या घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, या इसमाबद्दल कोणती माहिती आणि ओळख पटली नाही.

मृत इसमाच्या अंगात निळ्या रंगाचे टी-शर्ट आणि जांभळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली असून प्रेताचे उजव्या हातावर टॅटू

आणि सुजाता तर डाव्या हाताचे दंडावर बाळाचे चित्र गोंदलेले आहे.

सदर मृत इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास पोलीस स्टेशन अमडापूर येथे संपर्क साधावा.

असे आवाहन तपास अधिकारी सहायक फौजदार लक्ष्मण टेकाळे यांनी केले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/fundament-bolero-pick/