अमरावतीच्या वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनीत एका महिला पोलिस
शिपायाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
आशा राहुल तायडे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव
असून त्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.
शुक्रवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी त्यांच्या मुलांनी शाळेतून घरी आल्यावर आशा यांचा मृतदेह घरात आढळला.
त्या वेळी त्या घरी एकट्याच होत्या. प्राथमिक तपासात त्यांच्या गळ्यावर दोरीने गळा
आवळल्याचे व्रण आढळले असून, काही दागिनेही गायब असल्याचे समोर आले आहे.
पोलिस आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली.
घातपाताचा संशय वर्तवण्यात येत असून, लुटमार की इतर कोणते कारण याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, महिनाभरापूर्वीच वलगाव ठाण्यातील एका एएसआयची हत्या
झाल्यानंतर आता दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने पोलिस खात्यात खळबळ माजली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gas-cylinder-jhale-swasted-an-august-passoon-new-rate-applied/