हिरपूर येथे श्री गुरुदेव गोरक्षनाथ महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव भक्तिभावात संपन्न.
हिरपूर गावातील थोर संत श्री गुरुदेव गोरक्षनाथ महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव
दिनांक २४ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला.
माळीपुरा येथील गोरक्षनाथ मंदिरात संपूर्ण आठवडाभर धार्मिक कार्यक्रम, हरिपाठ, कथा, प्रवचने,
भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेत भक्तिरसात रंग भरले.
महोत्सवाची सुरुवात २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता कळसस्थापना व हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटनाने झाली.
यानंतर श्रींची पूजा, आरती व तुकाराम चरित्र ग्रंथकथा ह.भ.प. बाळकृष्ण मेटांगे महाराज (हिरपूर) यांच्या हस्ते सुरू झाली.
दैनंदिन कार्यक्रमांतर्गत:
सकाळी व सायंकाळी आरती, दुपारी कथा वाचन आणि रात्री भजन-कीर्तनाचा कार्यक्रम नियमितपणे पार पडला.
विशेषतः विविध महिला व पुरुष मंडळांनी दिलेल्या कीर्तन, भजन सादरीकरणामुळे परिसर भक्तिरसात न्हालून निघाला.
प्रमुख आकर्षण ठरलेले कार्यक्रम:
२४ जुलै रोजी श्री गुरुदेव भजन मंडळ, अमतवाडा
२७ जुलै रोजी श्री शिवानंद दादाजी महिला मंडळ, हिरपूर
२९ जुलै रोजी श्री मरी माता महिला मंडळ, हिरपूर
३० जुलै रोजी प्रभावी प्रवचनकार श्री वसंत बाबाजी गवळी (दर्यापूर) यांचे सत्संग
३१ जुलै रोजी श्री जयाजी महाराज हरिपाठ मंडळाच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप झाला.
याच दिवशी दुपारी १२:०० ते ४:०० वाजेपर्यंत भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण सप्ताहात मोठ्या संख्येने गावकरी व भाविक भक्तांनी उपस्थित राहून गुरुदेवांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी सनातन सतधारणा सेवा मंडळ, गोरक्षनाथ मंदिर समिती व हिरपूर गावकऱ्यांनी मिळून पार पाडली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर सर्व आयोजकांनी भाविकांचे आभार मानले आणि गुरुदेवांच्या कृपेसाठी प्रार्थना केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/katapurna-prashtapat-jalasath-vadha/