गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहराला
मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या बार्शी टाकळीतील काटेपूर्णा महान प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या धरणात 50.31 टक्के जलसाठा नोंदवला गेला असून,
जूनच्या अखेरीस केवळ 12 टक्के असलेला साठा अवघ्या पाच आठवड्यांत 38 टक्क्यांनी वाढला आहे.
या वाढलेल्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या अकोला शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
जलसाठ्यातील वाढ ही अकोल्यातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे,
मात्र प्रशासनाने अजूनही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-hatarun-rasta-jhala-jeevaghena/