इंग्लंडला आणखी एक मोठा झटका; ख्रिस वोक्स दुखापतीमुळे सामन्याबाहेर

इंग्लंडला आणखी एक मोठा झटका; ख्रिस वोक्स दुखापतीमुळे सामन्याबाहेर

लंडन | केनिंग्टन ओव्हल येथे सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील निर्णायक

पाचव्या सामन्यात इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार बेन स्टोक्स आणि ऋषभ पंत यांच्यानंतर

आता इंग्लंडचा प्रमुख बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस वोक्सही दुखापतीमुळे उर्वरित सामन्याबाहेर गेला आहे.

पहिल्या दिवशी बाउंड्रीवर बॉल अडवताना वोक्सला खांद्याला जबरदस्त मार बसला होता.

त्या घटनेनंतर तो थेट मैदानाबाहेर गेला आणि खेळात परतला नाही.

अखेर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत माहिती देत वोक्सच्या गैरहजेरीची घोषणा केली.

या सामन्यात वोक्सने 14 ओव्हर टाकत केएल राहुलला बाद केलं होतं.

पण त्याची अनुपस्थिती इंग्लंडसाठी निश्चितच डोकेदुखी ठरणार आहे,

कारण सामना आधीच निर्णायक टप्प्यावर आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/nomained-person-mhanje-malak-nahi-deaths-more-effective/