अकोला (प्रतिनिधी) –
संपत्ती, विमा, बँक ठेवी, म्युच्युअल फंड यामध्ये नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) असणं गरजेचं असलं,
तरी त्या व्यक्तीचा संपत्तीवर कायदेशीर हक्क नसतो, हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे.
बँक खाती, एफडी, विमा, लॉकर, डिमॅट खातं यामध्ये नमूद केलेली नामनिर्देशित व्यक्ती ही केवळ विश्वस्त (Caretaker) असते.
तिचं काम केवळ संबंधित रक्कम किंवा मालमत्ता घेऊन ती कायदेशीर वारसांकडे सुपूर्त करणं असतं.
तज्ज्ञांच्या मते, मृत्युपत्र (Will) ही कायद्याने अधिक मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे. मृत्युपत्रामध्ये संपत्ती कोणाला द्यायची,
याचा स्पष्ट उल्लेख असल्यास, संपत्ती त्याच वारसाच्या नावावर जाते – जरी कोणाचंही नाव नामनिर्देशित असलं तरी.
विशेषतः EPF खात्यांमध्ये मात्र नामनिर्देशित व्यक्तीच अंतिम लाभार्थी मानली जाते.
तिथे कायदेशीर वारसांचा दावा लागू होत नाही, त्यामुळे EPF खात्यांमध्ये नामनिर्देशित करताना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
गृहनिर्माण संस्था आणि विमा कंपन्यांमध्येही मालकी हस्तांतरणासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया असते.
सारांश म्हणजे, केवळ नामनिर्देशित व्यक्ती असल्याने मालकी हक्क आपोआप मिळत नाही.
त्यामुळे मृत्युपत्र लिहून ठेवणं ही काळाची गरज आहे, असं मत आर्थिक सल्लागार व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/sakhar-doh-vasantrao-naik-vidyalaya-vidyarthaninna-cycle/