अकोट
अकोट शहरातील मुख्य भागांमध्ये मोकाट जनावरांचा विळखा वाढत असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
शिवाजी चौक,सोनु चौक,अकोला रोड,यात्रा चौक,आठवडी बाजार,बस स्टँड रोड या प्रमुख ठिकाणी रस्त्यांवर मुक्तपणे फिरणारी गायी,
बैल,गुरे,वाहन धारकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत.
सध्या शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरु असतानाही रस्त्यांवरील मोकाट जनावरांवर कुठलीही ठोस कार्यवाही होत नसल्याने
नागरिकांत संतापाची भावना आहे.स्वच्छता,वाहतूक नियंत्रण,सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून,
प्रशासक आणि नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
“मोकाट जनावरे रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरत असताना,त्याच्यावर मालकी सांगणाऱ्या गुरेधारकांवर अद्याप एकही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
ही प्रशासनाची स्पष्ट कसूरी आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
नगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही केवळ कागदी कार्यवाही केली जाते.
मोकाट जनावर पकड मोहीम काही वेळा दिखाव्यासाठी राबवली जाते आणि नंतर थांबते.हीच स्थिती कायम असल्याने जनतेत नाराजी आहे.
प्रश्न असा आहे की सध्या अतिक्रमण मोहीम राबवणारे प्रशासन मोकाट जनावरांच्या समस्येकडे लक्ष देणार की नाही?
आणि मोकाट गुरांमुळे अपघात,सार्वजनिक त्रास होत असतानाही गुरे मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल का केले जात नाहीत.
यावेळी विजय कुलट विजय चंदन सुनील देठे,अनंत मिसाळ, टिनू विटणारे संतोष पायघन, अनिल तवर,
शिवा टेमझरे, डॉ दिनू भाऊ नागमते गोपाल कंटाळे, जगदीश दातीर, प्रतिक रंधे ,दीपक गावंडे आदींची उपस्थिती होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/horticulture-mahtwachi-baatmi-chief-minister-fadnavis-yanchi-muthi-declaration/