लाल तोंड्या मोठ्या माकडाची दहशत संपली…

लाल तोंड्या मोठ्या माकडाची दहशत संपली...

वन विभागाद्वारे करण्यात आले जेरबंद

गेल्या काही महिन्यांपासून नागरिक होते त्रस्त

बाळापुर तालुक्यातील वाडेगाव शिवारात गेल्या अनेक महिन्या पासुन एका लाल तोंड्या माकडाने दहशत निर्माण केली होती.

अनेकांच्या अंगावर धावुन जाणे, रस्ता अडवणे व चावणे यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते.

या संदर्भातील तक्रारी वनविभागा कडे करण्यात आल्या होत्या . त्यामुळे यापूर्वी वन विभाग रेस्कू टीमने प्रयत्न सुद्धा केले परंतु

झाड व दाट वस्ती असल्याने हे माकड वन विभागा च्या हाती लागत नव्हते. 30 जुलै रोजी वनविभागाच्या रेस्क्यू

टीमने पुन्हा प्रयत्न सुरू केले. सकाळपासून प्रयत्न केले असता सायंकाळी या टीमला यश आले.

आर एफ औ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड यांनी रेस्कू टीमचे गजानन इंगळे ,

वनरक्षक संघपाल तायडे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे वनरक्षक शेखर गाडबैल, तुषार आवारे ,

प्रदीप खडे यांनी घटनास्थळी जावून दिवसभर या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी रेस्कुटीमचे शुटर संघपाल तायडे यांनी

अचुक नेम घेवून बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन मारले. त्यानंतर माकड झाडवर गेले. अखेर या माकडाला पकडण्यासाठी बाळ

काळणे व शेखर गाडबैल यांनी नागरिकांच्या मदतीने झाडावर चढून अखेर या माकडाला जेरबंद केले.टीनावर चढले यांच्या सोबत गावकरी चढले ,

पकडण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा उंच फांदीवर चढले . रेस्कु टीमला गावकऱ्यांनी फार मोलाची मदत केली.

हा थरार पहाण्यास शेकडो लोक रस्त्यावर होते माकड पकडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला .

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-talukyatiyal-son-nitesh-ghat-yana-ayodhyethel-sendaramaan-veeramaran/