ओंकारेश्वर ते डोंगरशेवली कावड यात्रेचे भव्य आयोजन

ओंकारेश्वर ते डोंगरशेवली कावड यात्रेचे भव्य आयोजन

डोंगरशेवलीत कावड यात्रेचे जल्लोषात स्वागत

चिखली/प्रतिनिधी

श्रावण महिन्याचे आगमन होताच संपूर्ण महाराष्ट्रभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून,

त्याच पार्श्वभूमीवर ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथून डोंगरशेवली (ता. चिखली) येथे पारंपरिक कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले.

या यात्रेने चिखली तालुक्यात धार्मिकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत संपूर्ण मार्ग भक्तिभावात न्हावून टाकला.

डोंगरशेवली येथे यात्रा येताच गावाकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भक्तांनी ओंकारेश्वरच्या पवित्र नर्मदा जलाने भरलेली कावड खांद्यावर वाहत, तब्बल शेकडो किलोमीटरचा प्रवास पदयात्रा स्वरूपात पूर्ण केला.

संपूर्ण मार्गावर गावागावांत कावडीयांचे स्वागत, पूजन आणि जलपान व्यवस्था करण्यात आली. काही ठिकाणी आरत्या,

भजन-कीर्तन आणि बँड पथकांच्या गजरात कावडीयांचे स्वागत करण्यात आले.

डोंगरशेवली येथे आगमन होताच कावडीयांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशे फुलांच्या वर्षावात ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

महादेव मंदिरात जलाभिषेक, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

ही यात्रा केवळ धार्मिकतेचेच नव्हे, तर भक्ती, संयम, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरली आहे.

या आयोजनात मंगेश तायडे, रवींद्र भुतेकर, सतीश सावळे, अमोल राठोड, चेतन राठोड, दीपक राठोड, सुदर्शन राठोड, शिवा सावळे, ओम सावळे, छगन राठोड,

रमेश सोनुने, गौरव हाडे, नागेश राठोड, स्वप्नील राठोड, ओम राठोड, बिरजू बचिरे सह गोपाल वानखेडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

दोन्ही माजी आमदारांनी घेतले कावडचे दर्शन

चिखली विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार राहुल बोन्द्रे व बुलडाणा विधानसभा मतदार संघांचे

माजी आमदार ध्रुपतराव सावळे यांनी डोंगरशेवलीत कावडचे मनोभावे दर्शन घेऊन विधिवत पूजा व आरती केली.