स्मशानभूमीची उपाययोजना करण्यास अकोट नगरपालिका असमर्थ
अकोट (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी रोडवरील बौद्ध स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून,
परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
मृतदेह पुरविण्याची सुविधा नाही, पाण्याची व्यवस्था नाही,
तसेच स्मशानभूमीला मुख्य गेटदेखील नाही.
गवताने व्यापलेला व अस्वच्छ परिसर प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक ठरत आहे.
नागरिकांनी अकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे स्मशानभूमी
स्वच्छ करून आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
