विविध मागण्यासाठी कुरेशी समाजबांधवांचे प्रशासनाला निवेदन
मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा
कुरेशी समाजाच्या पारंपारीक व्यवसायाबाबत कायदेशीर अडथळे व अन्याय थांबविन्यासाठी शासन स्तरावर त्वरीत निर्णय घ्यावा
अन्यथा संवैधानिक मार्गाने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिनांक २८ जुलै रोजी
मंगरुळपीर येथील तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.
महाराष्टातील कुरेशी समाज पारंपारीक व कायदेशीररित्या पशुव्यापार,वाहतुक व कत्ल व्यवसायात आहे.
माञ अलिकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार,बेकायदेशीर एफआयआर,गोरक्षण केंद्रातुन जनावरे विक्री व चोरी होणे,
पोलिस आणी गोरक्षक कारवाया व्यापार्यांना ञासदायक घटनांमध्ये वाढ झाली आहे यामुळे कुरेशी समाजावर आर्थीक सामाजिक,
कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे.समाजाच्या अधिकारांवरही गदा आणल्या जात असल्याने ञस्त समाजाने या
बेकायदेशीर कृत्याला कंटाळुन आपला व्यापार बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
कुरेशी समाजावरचा हा अन्याय त्वरीत
दुर न केल्यास कायदेशीर मार्गाने मोठे आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.
सदर निवेदन राज्याचे राज्यपाल यांचेसह सर्व स्तरावर देण्यात आले असुन निवेदन देतेवेळी शेकडो कुरेशी समाजबांधवांची ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर जि.वाशिम
मो.8459273206