मनसे नेते राज ठाकरे यांनी काल उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर जाऊन भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दोघांमध्ये युतीची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
दरम्यान या भेटीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत या युतीमुळे कवडीचाही फरक पडणार नसल्याचा टोला लगावला आहे.
दरम्यान त्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे भोंग्याच्या मुद्द्यावरून भाष्य करीत राज्यातील सर्व अनधिकृत भोंगे काढण्यात येणार असल्याचा दावा केला आहे.
तर सध्या मुंबई भोंगे मुक्त झाली असून लवकरच उर्वरित महाराष्ट्र भोंगे मुक्त होईल असेही सोमय्या म्हणाले.
तर राज्यातील 42 हजारावर जन्म प्रमाणपत्र बोगस असून ते परत घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
अशी माहितीही यावेळी सोमय्या यांनी दिली.
दरम्यान बोगस जन्म प्रमाणपत्र परत घेतल्यानंतर एटीएस पुढील कारवाई करतील असेही सोमय्या म्हणाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasacha-bhajipiparvar-side-effects/