अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराज राजेश्वर मंदिरात आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, श्रीराज राजेश्वराच्या जलाभिषेकाची परंपरा भक्तिभावाने पार पाडली जात आहे.
श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व लक्षात घेता, अनेक भाविकांनी उपवास, व्रत व अभिषेकासह आपली श्रद्धा व्यक्त केली.
मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’ च्या गजरांनी वातावरण भक्तिमय झाले होते.
पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन अनेक भाविकांनी जलाभिषेक केला.
मंदिर समिती व पोलिस प्रशासनाकडून गर्दीचे योग्य नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
श्रावणात येथे अशीच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते तर
दर सोमवारी विशेष गर्दी पाहायला मिळते , हे अकोल्याच्या धार्मिक परंपरेचे जिवंत उदाहरण आहे.