अकोल्यात पालखी महोत्सवासाठी प्रशासन सज्ज;

अकोल्यात पालखी महोत्सवासाठी प्रशासन सज्ज;

अकोला जिल्‍ह्याला पालखी उत्सवाची वैभवशाली परंपरा असून उत्सव काळात

कायदे व सुव्यवस्था राखतानाच भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्द राहणार आहेत.

पालखी महोत्सव मध्ये शिवभक्तांना कुठेही गैरसोय नये या करिता पोलीस प्रशासन तसेच

जिल्हा प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली असून या बाबत आज जिल्हा पोलीस

अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

काही दिवस पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीत शिवभक्तांनी कावळ महोत्सव

मध्ये होणाऱ्या समस्यांबाबत आपले मत मांडले होते, त्या अनुषंगाने सुद्धा जिल्हा प्रशासनाने तसेच

पोलीस विभागाने संपूर्ण समस्यांचे निराकरण केले असून, कावळ मोहोत्सव मध्ये सुरक्षिततेच्या

दृष्‍टीने रेलिंग, 10 वॉचटॉवर, 411 सीसीटीव्ही, 10 ड्रोन, संवेदनशील परिसरात बॅरिकेटिंग,

महिला कावळ साठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी कामे पूर्ण करण्यात

आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/barsheetakahi-chohgav-sayikhed-dhamandari-g-pt/