बार्शीटाकळीच्या चोहगाव सायखेड धामणदरी ग्रा.पं.मध्ये 15 वित्त आयोग कामात भ्रष्टाचार: ग्रामस्थांची चौकशीची मागणी.

बार्शीटाकळीच्या चोहगाव सायखेड धामणदरी ग्रा.पं.मध्ये 15 वित्त आयोग कामात भ्रष्टाचार: ग्रामस्थांची चौकशीची मागणी.

अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील गट ग्रामपंचायत मौजे चोहगाव येथील 15 वित्त आयोगात

खरेदी केलेल्या वस्तूसाठी ग्रामसेवकांनी स्वतःच्या दुकानाचे बिल लावून बोगस खरेदी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीतून केला.

यामध्ये स्टेट लाईट खरेदी 1 लाख 5 हजार रुपये, डस्टबिन खरेदी 2 लाख 98 हजार 992 आणि इतर बोगस

साहित्य 10 लाख 60 हजार अशी साहित्यांची खरेदी करण्यात आलीय.. मात्र यामधील कोणतेही साहित्य गावात आणले नाही.

यासर्व गैर कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाही

करावी अशी मागणी गट ग्रामपंचायत चोहगाव, सायखेड येथील समस्त गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे,

येणाऱ्या काळात याबाबत कोणतीही ठोस निर्णय न झाल्यास समस्त गावकरी हे

पंचायत समिती बार्शीटाकळी येथे आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.

Byte : अक्षय राठोड, ग्रामस्थ

Read Also : https://ajinkyabharat.com/aklychaya-naveen-tehsil-karyakya-timanatat-independent/