कारगिल विजय दिनानिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन

कारगिल विजय दिनानिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन

कारगिल विजय दिनानिमित्त तिक्षणगत वेल्फेअर सोसायटी तर्फे अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक व त्यांची पत्नी सहभागी झाली होती,

ज्यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले.

रॅली दरम्यान कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन व मानवंदना देण्यात आली.

अकोला शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली जल्लोषात काढण्यात आली.

नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून या रॅलीचे स्वागत केले व शहीद जवानांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांची आठवण ताजी झाली असून,

तरुण पिढीला प्रेरणा मिळाली.

तिक्षणगत वेल्फेअर सोसायटीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/religious-stables/