मनभा – वार्ताहर
पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण येथे आज दिनांक 26.07.2025 रोजी सकाळी 11.30 ते 13.30
वाजेपर्यंत मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रदीप पाडवी सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण शिंदे सा. यांनी
विनापरवाना लावण्यात आलेल्या सर्व भोंगे अनुषंगाने मस्जीद, मंदीर, बोद्धविहार येथील धर्मगुरू, अध्यक्ष पदाधीकारी, मौलवी,
भंतेजी तसेच सर्व शांतता समिती सदस्य, तंटा मुक्त समिती अध्यक्ष,पोलीस पाटील यांची बैठक घेऊन
त्यांना ध्वनिप्रदूषण अधिनियम कायदा बाबत माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाचे
आदेशानुसार व मार्गदर्शन सूचनेनुसार आपण यापुढे परमिशन घेऊनच कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच भोंगे सुरु ठेवावे
अशा सूचना देऊन त्यानुसार कारवाई करण्यात येईल याबाबत सूचना देण्यात आल्या.
तसेच अवैध भोंगे वाजवणार नाही याबाबत सर्वांना समजावून सांगीतले. सदर मिटिंग करिता 100 ते 125 लोक हजर होते.