कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन प्रवासाला नवी दिशा – संपूर्ण महाविद्यालयाचा गौरव
मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंजिरी उल्हास करंडे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,
अमरावती यांच्याकडून पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.
ही मान्यता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विषयात असून, त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याचा हा अत्यंत प्रतिष्ठेचा टप्पा मानला जात आहे.
या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या संशोधन परंपरेला नवी दिशा मिळाली असून,
भविष्यातील संशोधकांना दर्जेदार मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या गौरवाच्या निमित्ताने महाविद्यालयात डॉ. मंजिरी करंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. वाय. ए. खर्चे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. आर. एम. चौधरी, प्रथम वर्ष विभागप्रमुख
प्रा. एन. ए. खर्चे, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. आर. शेकोकार, संगणक अभियांत्रिकी
विभागप्रमुख प्रा. एस. एल. फरफट, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्रा. नेहा मालोकार यांच्यासह
अनेक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी
डॉ. करंडे यांच्या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. खर्चे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. मंजिरी करंडे यांनी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात
सातत्याने केलेल्या योगदानामुळे महाविद्यालयाचा सन्मान वाढला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधक घडतील आणि त्यांनी या क्षेत्रात नवी शिखरे गाठावीत,
हीच अपेक्षा.” डॉ. करंडे यांचे हे यश महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक असून,
त्यांनी मिळवलेली पीएच.डी. मार्गदर्शक मान्यता ही संपूर्ण शिक्षण संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
संशोधन, नवोन्मेष व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीसाठी हे पाऊल महत्त्वाचे असून,
त्यामुळे कोलते महाविद्यालयाचा शैक्षणिक झेंडा अधिक उंचीवर गेल्याचे स्पष्टपणे जाणवते,
असे प्रतिपादन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते,
खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, सदस्य श्री. देवेंद्र पाटील व इतर संचालक मंडळाचे मान्यवर यांनी यावेळी केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/umbarda-bazar-yethil-shahet-plantation-program/