उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळा उंबर्डा बाजार व गो ग्रीन फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षकवर्ग, गावकरी आणि गो ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमा मागचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. जुनेद खान यांच्या मार्गदर्शनाने झाली.
त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व गावकऱ्यांसह विविध वृक्षांचे रोपण केले.
“झाडे लावा, जीवन वाचवा” या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची जबाबदारी स्वतः घेण्याचे वचन दिले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.
Read Also : https://ajinkyabharat.com/kutasa-yethil-banche-branch-officer-yanchi-praveen-dicker-yani-ghetli-bhet/