शेतकऱ्यांचे बंद केलेले खाते,व अडवून ठेवलेली रक्कम,बद्दल केली चर्चा
अकोट
कुटासा येथील बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी सन्मान योजना, निराधार योजना, विधवा,
घरकुल योजनेची रक्कम शेतकऱ्यांना न देता त्यांची खाते लॉक करून अडवून ठेवल्या जात होती.
या बाबत शेतकऱ्यांच्या समस्या बाबत अजिंक्य भारत वृत्त पत्रात बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
त्याची दखल घेत तळागाळातील जनसामान्यांचे कोणत्याही प्रकारचं काम असो ते आज पर्यंत कधीही अडलं नाही.
असे ख्याती प्राप्त सामान्य वर्गातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण डिक्कर यांची पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये ओळख आहे.
वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात दखल घेऊन व शेतकऱ्यांवर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संकटात
सापडण्याची वेळ आल्याने शेतकरी याची ताबडतोब दखल घेत प्रत्यक्ष कुटासा महाराष्ट्र बँक शाखाचे शाखाधिकारी
यांची प्रवीण डिक्कर यांनी तात्काळ भेट घेतली व शेतकऱ्यांचा पैसा का आडविण्यात आला.
या बाबत कर्तव्यदक्ष असलेले रणधीर सावरकर यांची व अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष दूरध्वनीवरून महत्त्वाच्या विषयाची चर्चा करून दिली.
ज्या शेतकऱ्यांची बँक खाते बंद करण्यात आली होती ती तात्काळ प्रवीण डिककर यांनी चालू करण्यास भाग पाडले.
तेव्हा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला.
शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक कुटासा शाखेमधून पीक कर्ज घेतलेले आहे.
व सातत्याने नापिकि असल्यामुळे ते कर्ज भरू शकले नाहीत.
त्यामुळे NPA झाल्या मुळे खाते बंद झाले त्याच प्रमाणे संजय गांधी निराधार,परीतक्त्या,घटस्फोटीत,विधवा,
हरकुल रक्कम,शासकीय योजनांची सबसिडी रक्कम,शेतकरी सन्मान घरकुल योजनेचे पैसे मिळत नव्हते.
अशा महत्त्वपूर्ण योजनांची रक्कम बँक खात्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अडवून ठेवण्यात आलेली रक्कम प्रविण डिक्कर यांनी
मा.आमदार रणधीर सावरकर यांचे सोबत चर्चा केली व हवालदिल झालेले बँक खाते धारक परेशान झाले होते.
त्यामुळे तात्काळ रणधीर सावरकर यांनी LDM सिंगमा साहेब यांचे सोबत चर्चा करून गोरगरिब,शेतकरी,
शेतमजुरांचि रक्कम यापुढे महाराट्र बँक कुटासा शाखेमध्ये जमा होताच तात्काळ
शेतकऱ्यांना विड्रॉल देण्यात येणार असल्याची माहिती शाखाधिकारी यांनी सांगितले.
तेव्हा भाजपाचे पदाधिकारी ज्ञानू झांमरे,प्रशांत आवारे,शुभम सावरकर,यांच्यासह उपस्थित शेतकरी यांच्या समक्ष शेतकऱ्यांचा
महत्वपूर्ण प्रश्न प्रवीण डिक्कर यांनी मार्गी लावल्याने शेतकरी,शेतमजूर यांच्यामध्ये आनंद व्यक्त झाला.
अजिंक्य भारत वृत्त पत्राची दखल
प्रतिक्रिया
कुटासा येथील बँकेत शेतकरी,शेतमजूर,यांचे विविध योजनेची खात्यात जमा झालेली रक्कम अडवून ठेवण्यात आली होती.
या बाबत वृत्त पत्रात बातमी प्रसिध्द झाली व काही शेतकऱ्यांनी मला स्वतःहा माहिती दिली.
त्यामुळे मी ताबडतोब बँकेत जाऊन बँकेचे अधिकारी यांच्या सोबत तसेच LDM अकोला सोबत चर्चा केली.
प्रवीण डिक्कर
भाजप तालुका अध्यक्ष किसान आघाडी.
प्रतिक्रिया
शासकीय योजनेचे अनुदान अडवणूक केल्या जातं नाही.
काही लोकांचा गैरसमज झाला होता.या बाबत कोणाची काहीही अडचण असल्यास माझ्या सोबत संपर्क करावा.
तेजल हुसे शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र कुटासा.
Read Also : https://ajinkyabharat.com/wp-admin/post-new.php