प्रतिनिधी, बोरगाव मंजू
अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणार्या किसनलाल नथमल गोएंका महाविद्यालय कारंजा लाड या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाच्या
प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणार्या आणि मुळच्या अन्वी मिर्झापूर गावच्या रहिवासी असणार्या
प्रा. डॉ. निलम छंगानी यांची अमरावती विद्यापीठचे पी.एच.डी. गाईड म्हणून नियुक्ती केली आहे.
गेल्या काही वर्षांपुर्वी छंगानी ह्यांना अमरावती विद्यापीठाने पी.एच. डी. देऊन गौरविले होते.
आणि त्याच आधारावर छंगानी यांचा अर्थशास्त्र या विषयातील असलेल्या गाढा अभ्यासाची दखल घेत अमरावती
विद्यापीठाने त्यांन पी.एच. डी. गाईड म्हणून नियुक्त केले आहे.
भविष्यात ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयावर पी. एच. डी. करायची आहे त्यासाठी छंगानी यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई इंदुबाई छंगानी , संस्था अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता आणि प्रा. राठोड यांना दिले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/both-gunhagari-pravritichaya-person/