दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी | पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा कठोर निर्णय

दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी | पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा कठोर निर्णय

अकोला, 26 जुलै 2025 – अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा

पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी कठोर पाऊल उचलले आहे.

अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस

अधिनियम कलम 55 अंतर्गत दोन वर्षांसाठी अकोला जिल्ह्याबाहेर हाकलण्यात आले आहे.

अकोट फाईल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार,

खालील दोन व्यक्तींनी वारंवार गुन्हे करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं:

1. सलमान खान एजाज खान (वय 25 वर्षे)

2. मुजीब उर्फ शाहरुख एजाज खान (वय 23 वर्षे)

(दोघेही रा. सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला)

या दोघांविरुद्ध वारंवार गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून शांतता धोक्यात येण्याची शक्यता होती.

त्यामुळे या प्रस्तावावर विचार करत दिनांक 24 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दोघांना जिल्हाबंदीचे आदेश बजावले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. चांडक यांनी यावेळी इशारा दिला की, “आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता

व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा गुन्हेगारी

प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल.

कोणतीही ढील दिली जाणार नाही.”

Read Also : https://ajinkyabharat.com/careful-rahrmik-sthavar-beckayadhiritya-bhonge-lavalayas-action-attmed-kishore-sheke/