धामणगाव गोतमारे | प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथे संत शिरोमणी श्री. सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
२३ जुलै रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने सकाळपासूनच गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
संत सावता माळी हे वारकरी संप्रदायातील एक महान संत मानले जातात.
“कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी” या त्यांच्या प्रसिद्ध अभंगातून त्यांनी जनसामान्यांना “आपल्या कामातच देव आहे” असा सशक्त संदेश दिला.
शेतकरी असलेल्या सावता माळी यांनी आपल्या कष्टमय जीवनातून भक्तीचा मार्ग समाजासमोर मांडला.
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
या मिरवणुकीत महिला भजनी मंडळांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
पारंपरिक वेशभूषा, टाळ- मृदुंगाच्या गजरात गावभर भक्तिरस दरवळत होता.
या प्रसंगी सालाबादप्रमाणे माळी समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
परिसरातील ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झालेला हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी एक आध्यात्मिक आनंदाचा अनुभव ठरला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akotchaya-umra-mandalayal-magchaya-right-mriga-bahar-bahar-2024/