अकोल्यात एम आय एम चे आंदोलन

अकोल्यात एम आय एम चे आंदोलन

अकोला शहरातील काही भाग पंतप्रधान आवास योजनेतून वगळण्यात आलेला आहे.

तर हे वगळलेले भाग या योजनेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी आज एम.आय.एम पक्षाच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आलं.

गेल्या सहा महिन्यापासून एमआयएमने ही मागणी केली होती.

मात्र सहा महिने उलटनही यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने हे आंदोलन महापालिका आयुक्त यांच्या कक्षा समोर

असलेल्या स्वागत कक्षावर चढून करण्यात आलं.

आंदोलकांनी यावेळेस या टिन शेडवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला .

मात्र पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेत खाली उतरविल आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shri-sant-savata-maharaj-yanchi-punyatithi-sajari/