रवींद्र सुरूशे
मेहकर
24 जुलै रोजी डोणगाव येथून जवळ असलेल्या मादणी फाट्या नजीक सुमारे अडीच वाजताच्या दरम्यान लाल
परी व मोटरसायकल चा भीषण अपघात घडला. या अपघातात संजीवनी चव्हाण या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार डोणगाव येथील प्रफुल मिसाळ हे एम एच 21 बी यु 89 59 या मोटरसायकलवर संजीवनी अरुण
चव्हाण व मंजुळा अरुण चव्हाण या दोन महिलांना डोणगाव कडे घेऊन जात होते.
याच दरम्यान पुसद वरून जळगाव खानदेश कडे जाणाऱ्या एम एच 14 एल एक्स 76 10 या एसटी बस मोटरसायकलवर
धडकल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये संजीवनी चव्हाण यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
तर प्रफुल्ल मिसाळ व मंजुळा चव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/unknown/