खामगाव – येथील श्रीमती सुरजदेवी रामचंद्र महिला महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विमलताई तराळे या महिला शिपायांना
रिटायरमेंटनंतर गंभीर आरोग्य समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्या सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असून,
उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम काढण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विमलताई या शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख वैशालीताई घोरपडे यांच्या आई असून,
त्या ३० जून २०२३ रोजी सेवा निवृत्त झाल्या. निवृत्ती लाभाची रक्कम मिळवण्यासाठी
त्यांनी संबंधित कर्मचारी जयेश चंद्रकांत नागडा यांना वेळोवेळी विनंती केली होती.
मात्र, नागडा यांनी निवृत्ती वेतनासाठी आधीच सुमारे दोन लाख रुपये घेतले असून,
आता मेडिकल बिलाच्या प्रमाणपत्रासाठीही २५ ते ३० हजारांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
कॅन्सरग्रस्त विमलताई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, त्यांच्या मुलीने महाविद्यालयाकडे प्रमाणपत्रासाठी विनंती केली.
मात्र, पैसे न दिल्यास पत्र देणार नाही, असा अडेलतट्टू पवित्रा नागडा यांनी घेतला.
एवढेच नव्हे तर त्यांनी अपमानास्पद व अश्लील भाषा वापरून मुलीला धमकावल्याचा आरोपही केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kalwadi-yehe-kisan-goshti-program-concluded-under-atmop-akot/