अकोट
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत प्रकल्प संचालक आत्मा अकोला
डॉ.मुरली इंगळे,प्रकल्प उपसंचालक आत्मा अकोला डॉ.प्रेमसिंग मारग,उपविभागीय कृषी अधिकारी अकोट तुषार ढंगारे,
तालुका कृषी अधिकारी अकोट कु.अश्विनी बिराजदार यांच्या मार्गदर्शनात सेवा सहकारी सोसायटी सभागृह,
कालवाडी ता.अकोट येथे कापूस, सोयाबीन,तूर पिक लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्यवस्थापन
या विषयावर क्षेत्रिय दीन/किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत समारोह
समाप्तीनंतर मंडळ कृषी अधिकारी अकोट 2 जि.बी.निगुडे यांनी क्षेत्रिय दिन/किसान गोष्टी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र अकोला येथिल कुलदीप देशमुख (विषय विशेषज्ञ कृषीविद्या) यांनी कापूस,सोयाबीन,
तूर,पीक लागवड तंत्रज्ञानबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.डॉ.चारुदत्त ठिपसे (विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र)
यांनी कापूस सोयाबीन,तूर पीक किड रोग व्यवस्थापन,जैविक खते वापर व महत्त्व इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी अकोट तुषार ढंगारे व तालुका कृषी अधिकारी अकोट
कु.अश्विनी बिराजदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली
व तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत माहिती दिली.अकोट तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सुरेंद्र जायले
(मक्रमपूर)जगन बगाडे (खापरवाडी) यांनी शेतीमध्ये करीत असलेले शेती विषयक प्रयोग, नैसर्गिक शेती इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना माहिती दिली.
सुहास तेल्हारकर संचालक-अमृततीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी अकोलखेड व रमेश धुळे अध्यक्ष श्री लक्ष्मीमाता शेतकरी उत्पादक गट अडगाव बू.यांनी कंपनी
व गटामार्फत राबविलेले उपक्रम तसेच राबविण्यात येत असलेले उपक्रम याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
श्री संत तुकाराम महाराज शेतकरी उत्पादक गट कालवाडी या गटाचे अध्यक्ष प्रा.अरुण हिंगणकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अशोकराव गावंडे (अध्यक्ष आत्मा समिती अकोट)उपकृषी अधिकारी जी.आर.मुकुंदे,
सहाय्यक कृषी अधिकारी कु.एस.एस.करवते,कु.आर.एस.गरबडे,ओमप्रकाश मोहोड,पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक
जीवन गावंडे,आर.एन.उबरहंडे (उमेद अभियान,पंचायत समिती,अकोट)निखिल लाहे (लोकसंचालित साधन केंद्र,अकोट)
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 2023_24 अंतर्गत स्थापित गटाचे अध्यक्ष/सदस्य शेतकरी उत्पादक कंपनी संचालक,
कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी व कालवाडी तसेच तालुक्यातील विविध गावातील शेतकरी महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत तुकाराम महाराज शेतकरी उत्पादक गट कालवाडी
या शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रा.अरुण हिंगणकर व गटातील सदस्यांनी सहकार्य केले.सदर क्षेत्रीय दीन किसान गोष्टी कार्यक्रम
समाप्तीनंतर मान्यवरांच्या हस्ते सभागृहाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व अल्पोपहार केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी अकोट 2 जी.बी.निगुडे तर आभार प्रदर्शन सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक
(आत्मा) राहुल अडाणी यांनी केले व सदर कार्यक्रमातील प्राप्त माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले.
सदर किसान गोष्टी क्षेत्रीय दीन कार्यक्रमाचे नियोजन राहुल अडाणी यांनी केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/shetkari-debt-waiver/