खामगाव वकील संघ निवडणूक २०२५

खामगाव वकील संघ निवडणूक २०२५

खामगाव (प्रतिनिधी) –

खामगाव वकील संघाची निवडणूक दिनांक २३ जुलै २०२५ रोजी शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.

एकूण ३०९ मतदारांपैकी २७८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निकालानंतर संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

अध्यक्षपदी अॅड. प्रशांत लाहुडकर विजयी

अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत अॅड. प्रशांत लाहुडकर यांनी १७१ मते मिळवून विजय संपादन केला.

उपाध्यक्षपदी अॅड. रमेश भट्टड (१६३ मते), तर सचिवपदी अॅड. जयंत खरसने पाटील (१७८ मते) हे विजयी झाले.

कोषाध्यक्ष आणि सदस्य पदाचे निकाल

कोषाध्यक्षपदी अॅड. राहुल पवार (१४६ मते) यांची निवड झाली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून पुढील उमेदवार विजयी ठरले:

अॅड. अंकित शर्मा – १७४ मते

अॅड. कु. जयश्री पाटील – १६९ मते

अॅड. कौस्तुभ जोशी – १६० मते

अॅड. अभिषेक पाटील – १५७ मते

अॅड. अभिजीत वानखडे – १५३ मते

अॅड. परमवीरसिंह शिख – १४३ मते

अॅड. सुनील अहिरे – १२७ मते

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार

निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना न घडता संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एडवोकेट आर. डी. भोजने, अॅड. अजय गणोरकर

आणि एडवोकेट राहूल सोनी यांनी जबाबदारीने व नेटकेपणाने कार्य केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/prahar-parshachaya-vatin-chauhata-bazar-yehe-chakkajam-movement/