नवी दिल्ली,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, कारण म्हणून त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले आहे.
त्यांच्या राजीनाम्यानंतर देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सध्या राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे कार्यवाहक उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
मात्र, भारतीय संविधानानुसार ६० दिवसांच्या आत म्हणजेच १९ सप्टेंबर २०२५ पर्यंत नवीन उपराष्ट्रपतीची निवड होणे आवश्यक आहे.
निर्वाचन आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार असून, ही निवड लोकसभा व राज्यसभेतील
मिळून ७८८ खासदारांच्या मतांनी होणार आहे. सिंगल ट्रान्सफरबल वोट प्रणालीद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडते.
एनडीएकडे सध्या बहुमत असल्याने त्यांचा उमेदवार जिंकण्याची शक्यता अधिक आहे.
मात्र, विपक्षीय इंडिया आघाडीही आपला उमेदवार उभा करून लढत रंगवू शकते.
भाजपकडे अनेक पर्याय उपलब्ध असून, राज्यपाल, केंद्रीय मंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांपैकी एखाद्याची निवड होऊ शकते.
उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचे नावही रेसमध्ये आघाडीवर आहे, कारण त्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/parasmadhyaye-dhagfutis-paus-paus-rest/