प्रतिनिधी – बोरगाव मंजू
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी-रंभापुर अंतर्गत अकराशे तेरा हेक्टर क्षेत्रावर खरिपातील
पिके यशस्वीपणे बहरली असून, सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांना चांगले फुलोरे आले आहेत.
यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
या यशामागे ‘बुलॉक ड्रोन बेस्ड फररो’ (PDKV-BBF) पद्धतीसह पंचसूत्रीय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
यामध्ये योग्य बीजप्रक्रिया, तणनाशकांचा वापर, उत्तम बियाणे निवड, पेरणीसोबत खत व्यवस्थापन व पेरणीपूर्व नियोजन यांचा समावेश होता.
डॉ. शरद गडाख (कुलगुरू), डॉ. शिवाजी नागपुरे (मुख्य बीज उत्पादन अधिकारी), व राजेश झंजाळ (उप अधिकारी)
यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन झाले.
अल्पावधीतच सोयाबीनची पेरणी सुमारे 1000 हेक्टरवर, तूर, मूग, उडीदची 100 हेक्टरवर पूर्ण करण्यात आली.
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस यामुळे शेती संकटात असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदाच्या
हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पेरणीच्या वेळेस मृग नक्षत्रात समाधानकारक पावसामुळे पिकांना सुरुवातीलाच पोषक वातावरण मिळाले.
18 जुलै 2025 रोजी कुलगुरू डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. माने यांनी अचानक दौरा करत पीक पाहणी केली,
त्यावेळी पिकांची अवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रयत्नात विद्यापीठाच्या विविध अधिकाऱ्यांसह शेती सेवाभावी संस्था सक्रिय सहभागी झाल्या आहेत.
हे यश केवळ तांत्रिक मार्गदर्शनाचे नव्हे, तर नियोजनबद्ध शेती व्यवस्थापनाचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/navya-batalyanth-of-juni-kikatash-bharu-vamri/