दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न

दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी |

विवरा

देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप लावून, वैयक्तिक माहिती उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच प्रकारात विवरा (ता. पातूर) येथील समाजसेवक मंगेश केनेकर यांना २ कोटी २० लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःला ‘सायबर बोर्ड ऑफ इंडिया’चे अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून धमकी दिली, मात्र मंगेश केनेकर यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ चान्नी पोलिस गाठून तक्रार दाखल केली. विवरा येथील रहिवासी आणि समाजासाठी वैद्यकीय मदत करणारे रुग्णसेवक मंगेश केनेकर यांच्याशी काही दिवसांपूर्वी एक फोन कॉल आला. फोनवरील व्यक्तीने आपले नाव ‘राहुल

Related News

कुलकर्णी’ सांगितले. आपण ‘सायबर टाटा लोकेशन बोर्ड ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचा दावा केला.

त्याने सांगितले की, ‘तुमच्या नावावर मुंबईतील कॅनरा बँकेत बोगस खाते उघडण्यात आले असून, त्या खात्यातून दोन कोटी वीस लाख रुपयांची मनी लाँड्रिंग झाली आहे. हे ऐकून मंगेश केनेकर चक्रावून गेले. लगेचच कॉल दुसऱ्या तथाकथित वरिष्ठ अधिकाऱ्याला, गणेश (सायबर कॅफे बोर्ड चेन्नई) यांच्याकडे जोडण्यात आला.

या व्यक्तीने व्हिडिओ कॉलद्वारे अधिकृत पोशाख परिधान करून संवाद साधला. मंगेश यांच्यावर ‘तुमच्या नावावर २० गुन्हे दाखल आहेत.. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मंगेश केनेकर यांनी चान्नी पोलिस स्टेशन आणि अकोला सायबर गुन्हे शाखा येथे याबाबतची तक्रार दाखल केली. त्यांनी यामध्ये संपूर्ण संवाद, व्हिडिओ कॉलचा उल्लेख आणि संबंधित मोबाईल नंबरही पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहेत.

पोलिसांकडे तक्रार करा

तुमच्या खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार झालेत, गुन्हे दाखल आहेत. अशा थापा मारून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांनी अशा कोणत्याही कॉलला बळी पडू नये, घाबरून कोणतीही माहिती देऊ नये. जवळच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर पोलीसांकडे संपर्क साधावा.

रवींद्र लांडे, ठाणेदार, चान्नी पोलिस स्टेशन

गरीब रुग्णांसाठी काम करतो

माझ्या नावावर दोन मोबाइल क्रमांक आहेत. मला जे बोलायचे होते ते मी स्पष्टपणे सांगितले. मी तत्काळ पोलिस व सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मंगेश केनेकर, समाजसेवक, रा. विवरा

Related News