मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासमारीची वेळ आली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मंगळवार बाजार, देवरन रोड, रेल्वे स्टेशन रस्ता आणि विठ्ठल मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवर व हातमजुरी करणाऱ्यांवर ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे. दरम्यान, अपंग व्यक्तीने आपल्या पोटाची खोटी भरण्यासाठी थोडी जागा अडवून व्यवसाय सुरू केला होता. मात्र कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने त्याचे दुकान उद्ध्वस्त केले. आता त्याच्याकडे ना पर्याय आहे, ना मदतीचा हात!
खाजगी व्यवसायिकांना अभय, गरीब पांगळा उघड्यावर!
दुसरीकडे शहरातील मोठे हॉटेल्स, बार, बँका आणि व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण केले गेले असूनही, प्रशासन त्यांच्यावर हात घालत नाही. त्यांच्या समोरील दुचाकींच्या रांगा, अन्न विक्रीच्या स्टॉल्स, मिनी बारचे प्रकार – याकडे नगर परिषद डोळेझाक करत आहे. ही एकतर्फी भूमिका आता लोकशाहीच्या नावावर कलंक बनत चालली आहे.
Related News
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
शहरात प्रश्न – अपंगांना जगायचा हक्क नाही का?
दिवसेंदिवस शहरातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात अपंग व आर्थिक दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायाने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे.
ही मोहीम म्हणजे केवळ बळीचा बकरा शोधण्याचे साधनच?
यापूर्वी सुद्धा प्रशासनाने केवळ काही दिवस मोहीम राबवून ‘दिखावा’ केला होता आणि नंतर अतिक्रमण पूर्ववत झाले. त्यामुळे यंदाची मोहीमही केवळ गोरगरिबांवर धडका घालण्यासाठीच की काय, असा संशय उपस्थित होत आहे.
सवाल हाच – प्रशासनाच्या नजरा शक्तीवर आणि न्यायाच्या व्याख्येवर पुन्हा विचार व्हायला हवा का?