विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.

विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.

अकोला – विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,

वंचित विकास – पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,

सोनंगाव रोड, चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथे दिनांक 12 व 13 जुलै 2025 ला मोठया उत्सहात पार पडली

Related News

या परिषद चे उदघाट्न दिनांक 12 जुलै ला 4 वाजता जेष्ठ समाजसेविका रजियाताई सुलताना,

अमरावती प्राचार्य विश्वाश दामले, सुचिता बर्वे, अमरावती, वंचित विकास, अभयाप्रकल्प प्रमुख मीनाक्षी नवले -पुणे,

मयूर बागुल – पुणे, बंडू आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या दोन दिवशीय परिषद ला मार्गदर्शन,

करण्यासाठी मीनाक्षी नवले वंचित विकास पुणे, मयूर बागुल – पुणे, अजय डबले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती प्राची साळवे,

प्रा घनश्याम दरणे यवतमाळ, अमोल रसे सर,प्रा अनिता धुर्वे, सारिका वानखडे,निरूपमा ताई देशपांडे संपूर्ण बांबू केंद्र धारणी,

यांचे मार्गदर्शन लाभले .या परिषद मध्ये महाराष्ट्र मधील 60 सेवाभावी संस्था प्रतिनिधी चा सहभाग होता

अभया अभियान हे एकल महिलांच्या विविध विकासात्मक कार्य करण्या साठी विचार मंथन व दिशा ठरविण्यात आली.

या दोन दिवशीय परिषद मध्ये कृती शील एकल महिलां भारती डोंगरे, संगीता ठाकूर, सुनीता वासनिक,

गीता साठवणे अनिता धाबर्डे याना अभया नारी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.

महिला विकासावर कार्य करण्याऱ्या कार्यकर्त्यां रंजिता तराळे, अमरावती, संगीता गायकवाड अचलपूर,

आरती कारंजेकर, यांना नारी सन्मान, व एकल महिलांच्या विकास वर कार्यकरणारे संस्था प्रतिनीधी, दिलीप बिसेन,

ग्रामविकास संस्था भंडारा, तुषार हांडे सेवाधर्म संस्था अकोला यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या परिषद चे प्रास्तविक बंडू आंबटकर सूत्रसंचालन पल्लवी यादगिरे, आभार अनिता कांबळे यांनी केले

तसेच या परिषद च्या यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हर्षाली आंबटकर, योगेश कांबळे, ओम गड्डीनकर,

राजीव शिवणकर, अनुसया निशाद अशा अनेकांचे सहकार्य लाभले.

Read Also : https://ajinkyabharat.com/pikavima-manjur-tarihi-tight-rakkam-shetkyancha-sangam-krishi-jishankana-request/

 

Related News