इंझोरी | प्रतिनिधी
इंझोरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झाले आहेत. अति पावसानंतर आता
रिमझिम पावसामुळे २०० एकरांवर दुबार पेरणी खोळंबली असून शेतकरी अक्षरशः
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
आसमानी आणि सुलतानी संकटात सापडले आहेत.
यावर्षीच्या सुरुवातीला अति पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली पहिली पेरणी फसली. बियाणे उगवलेच नाहीत,
त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. काहींनी बैलजोडीच्या साहाय्याने कसाबसा दुबार पेरणीचा प्रयत्न केला,
पण मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे ती पेरणीही अडकली आहे.
अतिओलाव्यामुळे जमिनीत केलेली पेरणी पुन्हा उगवेल का? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने आशेवरच ते तिसऱ्यांदा पेरणी करण्याचा विचार करत आहेत,
मात्र खर्च वाढला असून हमीभाव, विमा आणि शासनाची मदत मिळेल की नाही, याविषयीही संभ्रम कायम आहे.
“बियाणं, खतं, मजुरी आणि बैलांची मेहनत यावर शेतकरी तिसऱ्यांदा खर्च करत आहे,
पण निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचं जगणंच संकटात आलं आहे,” अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शासनाने पंचनामे करून
आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/patur-firekhed-rastyavar-trector-overturned/