तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु

आदिवासी भागातील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा – प्रवीण वैष्णव, शिवसेना तालुकाप्रमुख तेल्हारा

तेल्हारा | प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील अडगाव-खैरखेड-धोंडाआखर रस्त्याच्या कामात मोठ्या

प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव यांनी केला आहे.

Related News

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेले हे रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच उखडू लागल्यामुळे

या निधीचा योग्य उपयोग न झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाची

उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कारवाई न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रवीण वैष्णव म्हणाले, “शासनाने कोट्यवधींचा निधी आदिवासी भागात विकासासाठी मंजूर केला,

पण भ्रष्टाचारामुळे या निधीचा गैरवापर झाला आहे. पावसाळा सुरु होण्याआधीच रस्ते उखडले जात आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

या निवेदनावर पुढील नेत्यांची उपस्थिती होती: उपजिल्हाप्रमुख संजय अढाव,

शहरप्रमुख अनिकेत ढवळे, अनिल घोगले, युवासेना पदाधिकारी प्रसाद देशमुख, निखिल ठाकूर आदी.

या निवेदनाची प्रत पुढील मान्यवरांना देण्यात आली आहे:

  • मा. ना. एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

  • मा. ना. देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, महाराष्ट्र

  • जिल्हाधिकारी, अकोला

शिवसेनेचे म्हणणे आहे की, “शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना वाचवले जाणार नाही,

ही भूमिका शासनाने स्पष्ट करावी. विकास कामे दीर्घकाळ उपयोगी ठरतील, यासाठी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हवे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/hingana-nimba-gawakade-janya-rastyala-ale-talawache-swaroop/

Related News