धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल

धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये

लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

इगतपुरी ते अकोला दरम्यान हा प्रकार घडला असून आरोपीने पीडितेला आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला.

Related News

मात्र, घरच्यांनी नकार दिल्यानंतर तिला अकोला स्थानकात सोडून आरोपी पसार झाला.

पीडित मुलगी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून तपास पुढे कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही याच मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/raj-thackeray-yancha-pakhi-parishyana-sakta-gesture/

Related News