नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
“जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी धोरणांना पाठिंबा देईल, त्याच्यावर टॅरिफ लावू,” असं ट्रम्प यांनी त्यांच्या “ट्रुथ सोशल” पोस्टद्वारे जाहीर केलं.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ब्राझीलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेनंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं असून,
त्यावर ब्राझीलचे अध्यक्ष लुला द सिल्वा यांनी कठोर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “जगाला सम्राट नको, आम्ही सार्वभौम देश आहोत.“
चीननेही ट्रम्पच्या धमकीला उत्तर देत स्पष्ट केलं की, BRICS कोणत्याही देशाच्या विरोधात नाही.
भारतावर परिणाम होणार?
भारत ब्रिक्सचा संस्थापक सदस्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच ब्राझीलमधील परिषदेत सहभागी झाले होते.
तसेच २०२६ मध्ये भारत ब्रिक्स परिषदेला यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या धमकीचा भारतावर परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की, “भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार
करार लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचेल.” मात्र, ब्रिक्ससंदर्भातील भूमिकेमुळे भारताची कोंडी होऊ शकते.
महत्त्वाचे मुद्दे:
-
ट्रम्प यांची BRICS देशांना टॅरिफची धमकी
-
ब्राझील व चीनकडून तीव्र प्रतिक्रिया
-
भारत BRICSचा भाग, पण अमेरिकेसोबतही व्यापार करार जवळ
-
2026 मध्ये भारतात BRICS परिषद होणार
Read Also : https://ajinkyabharat.com/varichaya-watwar-shachecha-utsav-bhaktirasat-nhahalya-chimukalya-bhavna/