आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा

आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा

आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,

मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे

खोल खड्डे पडले त्यामुळे सदर रस्ता अपघाताचा बनला आहे. तरी संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Related News

पातूर तालुक्यातील बाभुळगाव आलेगाव रस्त्याचे रुंदीकरण ३ ते ४ वर्षापूर्वी कार्ला गावा पर्यंत करण्यात आले.

दरम्यान कार्ला ते आलेगाव पर्यंत सदर रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही.त्यामुळे चारचाकी अप डाऊन करणाऱ्या वाहनांची चाके

चिखलात फसत असल्यामुळे आणि वाहन पलटी होण्याच्या भीतीने वाहन चालक सडकेच्या खाली टाकीत नाहीत त्यामुळे,वाहन

चालकांमध्ये वाद होण्याचे प्रकार नीत्याचे झाले आहे.त्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे झाला होता महीलेचा २०१७ मध्ये मृत्यू

२१ सप्टेंबर २०१७ रोजी आसोला येथील दांपत्य आलेगाव येथील प्रा आ केंद्र येथे पत्नीच्या प्रसूती तपासणी करीता

दुचाकीने जात असताना कार्ला येथे सडकेच्या कडेला मोठ,मोठे खड्डे पडलेले होते.त्या खड्ड्यातून दुचाकी सडकेवर घेत

असताना बाईक घसरून सडकेवर कोसळली आणि मागाहून येणाऱ्या ट्र्याक्टर चे चाक महिलेच्या पोटावरून गेल्याने महिलेस प्राणास मुकावे लागले होते.

सद्या कार्ला ते आलेगाव पर्यंत सडकेच्या कडेला मोठ,मोठे खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे सदर रस्ता अपघाताचा बनला आहे.

वरील अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगाने रस्त्याचे रुंदीकरण करावे सद्या पावसाचे दिवस

असल्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे तात्काळ भरून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/railway-sthankawar-nimbachaya-jhadachi-fandi-tutli-wildlife-sevemu-vachle-sixty-bugle/

Related News