रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!

रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!

अकोला | प्रतिनिधी

आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी

तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले व प्रौढ – जमिनीवर कोसळले.

Related News

यामध्ये त्यांची घरटी पूर्णपणे नष्ट झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बगळ्यांवर संकट कोसळले.

पिल्ले आणि मोठे बगळे सैरावैरा पळू लागले, काहीजण घाबरून उडून गेले तर काही अपघाताने जखमी झाले.

घटनास्थळी स्थानिक ऑटो चालक, अरविंद पाटोळे, लालशा, अनिवृध्द गजबिए आणि जब्बार शेख यांनी तत्काळ

परिस्थितीची दखल घेतली आणि सर्पमित्र व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना याची माहिती दिली.

बाळ काळणेंची तत्पर सेवा – जीवदानाची शर्थ

बाळ काळणे यांनी पावसातच घटनास्थळी धाव घेतली आणि जमिनीवर सैरावैरा फिरणाऱ्या बगळ्यांना स्वतःच्या हाताने एक

एक करून सावधपणे उचलून बॉक्समध्ये ठेवले.

बगळ्यांकडून चोच मारण्याचा धोका असूनही काळणे यांनी धैर्याने आणि तन्मयतेने हे कार्य पार पाडले.

स्थानिक आणि वनविभागाचे मोलाचे सहकार्य

या बचावकार्यात वनरक्षक शेखर गाडबैल, चालक यशपाल इंगोले, अक्षय खंडारे, पशुवैद्यकीय

अधिकारी मेघा वानखडे आणि प्रविण पवार यांनी पुढाकार घेतला.

जखमी आणि धोक्यात असलेले सर्व बगळे योग्य पद्धतीने गोळा करून वनविभागात उपचारासाठी नेण्यात आले.

वनविभागाचा विशेष गौरव

या तत्पर आणि संवेदनशील कार्याबद्दल बाळ काळणे यांचे सहाय्यक वनसंरक्षक नम्रता टाले,

आरएफओ विश्वास थोरात आणि वनपाल गजानन गायकवाड यांनी कौतुक केले.

सध्या सर्व बगळ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना योग्य निगा राखत वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/mahamargawar-dambi-java-car-overturned-a-wound/

Related News