मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थानकाच्या परिसरात आढळून आला.
यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
सदर इसम मागील काही दिवसांपासून बसस्थानकावरच उपाशीपोटी राहात होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,
काही दिवसांपूर्वी टोल नाक्यावरून आलेल्या एका वाहनाने या व्यक्तीला येथे सोडले होते.
मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची मदत अथवा देखरेख त्याच्यावर झाली नाही.
आज सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर शहर पोलीस आणि जय गजानन आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात हलवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, सदर इसमाची ओळख अद्यापही पटलेली नाही.
नागरिकांनी काही माहिती असल्यास तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बसस्थानकासारख्या वर्दळीच्या भागात एका बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रश्न निर्माण झाले आहेत.
या घटनेमुळे नगरपालिकेच्या व सामाजिक संस्थांच्या बेवारस लोकांसाठीच्या
बेपर्वाई वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाची भूमिका तपासणीखाली आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolkhed-yehet-gunvant-vidyarthayankancha-mitragaurav-soh/