धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अकोट | प्रतिनिधी

कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,

विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरले आहे.

Related News

पथकाचा अहवाल:

३ जुलै रोजी करण्यात आलेल्या सात पथकांच्या आरोग्य सर्वेक्षणात कॉलऱ्याच्या संसर्गाची शक्यता असल्याचं निदर्शनास आलं.

मृत व्यक्तीच्या अहवालानंतर गावात तत्काळ घरोघरी मेडिसिन टाकणे, दवंडी देऊन जनजागृती,

तसेच पाण्याचे लिकेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गंभीर निष्कर्ष:

  • गावात पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात लीकेज असल्याचे स्पष्ट झाले.

  • OT टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत.

  • दुषित पाण्यामुळे कॉलऱ्याचा फैलाव होण्याची शक्यता वैद्यकीय पथकाने नाकारलेली नाही.

प्रशासनाचे पावले:

गावात चार सर्वेक्षण पथके कार्यरत असून, पाणी नमुने आणि विषारी द्रव्य नमुने जिल्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीला तातडीने लिकेज बंद करण्यास सांगण्यात आले आहे.

मृतक कुटुंबाची मागणी:

विष्णू बेंद्रे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना सांगितले, “ग्रामपंचायतीला यापूर्वीही दूषित पाण्याबाबत अनेकदा सांगितले,

परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अचानक पतीच्या प्रकृतीत बिघाड होऊन अकोला शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आमचं कुटुंब आर्थिक अडचणीत असून, सरकारने तातडीने मदत करावी.”

धामणा बु. येथे कॉलऱ्यासारख्या संसर्गजन्य आजाराचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि

जिल्हा प्रशासनाने सामूहिक आणि तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

अन्यथा याचा फटका संपूर्ण परिसराला बसू शकतो.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akolyatil-shetkya-mulga-banala-cricket-panch/

Related News