अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क

अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क

अकोला प्रतिनिधी |

अकोला जिल्ह्यात आजपासून 4 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात जून महिन्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीच्या 113% अधिक आहे.

Related News

त्यामुळे पुढील काही दिवस संततधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली

असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.

ग्रामीण भागातही नद्यांना पूर आल्यामुळे पाणी गावात शिरले होते आणि काही गावांचा संपर्क तुटला होता.

झरंडी व आजूबाजूच्या भागात अनेकांनी गच्चीवर आसरा घेतल्याची घटना समोर आली होती.

आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही अलर्टवर ठेवण्यात आले असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also :   https://ajinkyabharat.com/hindi-sakticha-decision-uddhav-thakarancha-movement-raj-thakaranchi-udi-prataparao-jadhav-yanchi-tika/

Related News