धनकवाडी जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा

धनकवाडी जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा

विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी

अकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा

धनकवडी येथे नविन सत्रामध्ये सोमवार दि.23 जुलै 2025 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Related News

शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे मिठाई व पुष्पगुच्छ देऊन, संपूर्ण शाळेत व शाळेच्या परिसराची साफसफाई,

रंगरंगोटी करून, मोठ्या हर्षउल्लासामध्ये शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून करतवाडी ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास पांडे, पत्रकार विशाल आग्रे,

कैलास इंगळे, आनंद इंगळे, विक्की वानखडे, छाया मेंढे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज सरकटे होते.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नवनीता चौधरी,कु. विभा शेरकर सहाय्यक शिक्षिका,

सौ अलका पांडे अंगणवाडी सेविका, सौ प्रियंका वाकोडे मदतनीस यांच्यासहित

विद्यार्थी व पालक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/kholeshwarat-ujrale-state-of-the-art-public-toilets/

Related News