निंबोळीच्या उपयोगाने रासायनमुक्त शेतीकडे वाटचाल

निंबोळीच्या उपयोगाने रासायनमुक्त शेतीकडे वाटचाल

पारूर, ता.: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या श्रीमती सुमित्राबाई आंधारे

कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषिकार्य अनुभव कार्यक्रम

अंतर्गत जामरून (ता. पातूर) येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Related News

या उपक्रमात नैसर्गिक पद्धतीने रोग व कीड व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करून देण्यात आले.

विशेषतः निंबोळीच्या अर्काच्या वापरावर भर देत कीड नियंत्रणाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ठिबक सिंचन, शाश्वत शेती प्रणाली, माती परीक्षण, पीक उत्पादकता

वाढविण्याच्या उपाययोजना तसेच पिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, कार्यक्रम प्रमुख पांडुरंग जाधव, समन्वयक शिवकुमार

राठोड आणि मार्गदर्शक रोहित कानोजे यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थी कृषिदूत रत्नेश गुल्हाने, प्रतीक जामनिक, मो. असीर खान, आकाश पडघान आणि चतुरसिंग

भोसले यांनी सादरीकरण कौशल्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

Read Also :  https://ajinkyabharat.com/jagavamadhyay-khatikna-sonam-chandit-dilasa-darat-muth-ghasaran/

Related News