फडणवीस यांची आळंदीतील कत्तलखान्याविषयी भूमिका

फडणवीस यांची आळंदीतील कत्तलखान्याविषयी भूमिका

पुणे | 21 जून 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात विविध मुद्द्यांवर खुलासा केला.

आळंदीतील कत्तलखान्यासाठी राखीव जागा रद्द करण्याचे आदेश स्वत:

Related News

दिल्याचे सांगत त्यांनी वारकरी संप्रदायाला आश्वस्त केले.

मुख्य मुद्दे:
🔸 कत्तलखान्याचे आरक्षण रद्द – आळंदीत कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, असा ठाम शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
🔸 शेतकरी कर्जमाफी – सरकार दिलेला शब्द पाळेल, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
🔸 पावसाळी नियोजन – सांगली-कोल्हापूर भागासाठी धरण विसर्गाचे योग्य नियोजन सुरू असून शेजारील राज्यांशी समन्वयही सुरू.
🔸 योग दिनाची प्रशंसा – मोदीजींमुळे योगा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला, योग ही संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत व्यक्त.
🔸 पुणे विद्यापीठाचे गौरव – विद्यापीठाचा दर्जा वाढल्याचे स्वागत, विभागातील तुटवड्यावर काम सुरू असल्याचेही सांगितले.

या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट व ठाम भूमिका घेतली असून प्रशासन सजग आहे, हे यावरून दिसून येते.

Related News